Koregaon Park Police : वरिष्ठ निरीक्षकावर न्यायालय कडाडले, अटक करून हजर करा

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान वारंवार बोलावणे धाडूनही न्यायालयात हजर न रहाणे एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट आले आहे. साक्ष द्यायला अनुपस्थित राहणाऱ्या या तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करम्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 12:57 pm
Koregaon Park Police : वरिष्ठ निरीक्षकावर न्यायालय कडाडले, अटक करून हजर करा

वरिष्ठ निरीक्षकावर न्यायालय कडाडले, अटक करून हजर करा

लक्ष्मण मोरे

पुणे : कोरेगाव पार्क (Koregaon Park) पोलीस ठाण्यात दाखल (Police Station) असलेल्या एका गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान वारंवार बोलावणे धाडूनही न्यायालयात (court) हजर न रहाणे एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगलट आले आहे. साक्ष द्यायला अनुपस्थित राहणाऱ्या या (Pune News) तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करम्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.

शिवाजी डी. कांबळे असे निरीक्षकाचे नाव असून, ते कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० मे २०१३ रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवॄत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून प्रत्येकी रूपये वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे हे प्रकरण होते. तसेच फिर्यादीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याची ही फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करून २४ सप्टेंबर २०१३मध्ये न्यायालयात आरोरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी २७ जानेवारी २०१७ मध्ये सुरू झाली असून  आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद पवार, ॲड. आकाश देशमुख काम पहात आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे. २०१९ पासून खटल्याचे तपासी अंमलदार म्हणून वरिष्ठ निरीक्षक एस. डी. कांबळे यांची साक्ष नोंदवणे बाकी आहे. त्या कारणामुळे खटला प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात सादर केला. तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी वारंवार फोन करूनही फोन उचलले नाहीत. सुरुवातीला काढण्यात आलेल्या पकड  वॉरंटची सूचना त्यांना व्हाटसॲपद्वारे कळविण्यात आले होती. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे नमूद केलेले आहे. हा अहवाल न्यायालयासमोर आल्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज केला. निरीक्षक कांबळे यांना पकडून आणण्यासाठी पकड वॉरंट काढण्यासाठी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी कांबळे यांनी पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२३ मध्ये होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest