Pune Crime News : चारित्र्याचा संशय... पतीकडून पत्नीवर कोयत्याने वार

कौटुंबिक कारणावरून पत्नीचा छळ करून तिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी पतीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 23 Oct 2023
  • 11:10 am
Pune Crime News : चारित्र्याचा संशय... पतीकडून पत्नीवर कोयत्याने वार

चारित्र्याचा संशय... पतीकडून पत्नीवर कोयत्याने वार

लक्ष्मण मोरे

पुणे : कौटुंबिक कारणावरून पत्नीचा छळ करून तिच्यावर चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी पतीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते २२ ऑक्टोबर साडेतीन वाजे दरम्यान घडला.

संजय कारभारी शिंदे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वैष्णवी अंकुश लवांडे (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे आणि वैष्णवी यांचे ९ जुलै २०२३ रोजी लग्न झाले. आरोपीने त्यानंतर 'तुझ्या आई-वडिलांनी माझ्या लग्नात खर्च केला नाही. तुझ्या माहेरकडून ३० लाख रुपये घेऊन ये' असे वारंवार बोलून त्यांचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध करीत असताना काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

२१ ऑक्टोबर रोजी वैष्णवी या त्यांच्या नणंदेच्या मुलाच्या वाढदिवसा वरून घरी जात होत्या. त्यावेळी संजय याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच किचन मधील लोखंडी खलबत्ता डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून प्राणघातक हल्ला करीत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्यांच्या वडिलांना बोलावून घेतल्यानंतर  संजय याने त्यांच्यावर सुद्धा धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest