Pradeep Kurulkar : …तर डॉ. प्रदीप कुरुलकरला पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल, सरकार पक्षाचा जामिनासाठी विरोध

डीआरडीओ संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरला जामीन दिल्यास तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल, अशी भीती व्यक्त करीत सरकार पक्षाने जामिनासाठी विरोध केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 12:52 pm
 Pradeep Kurulkar : …तर डॉ. प्रदीप कुरुलकरला पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल,  सरकार पक्षाचा जामिनासाठी विरोध

…तर डॉ. प्रदीप कुरुलकरला पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल

पुणे : डीआरडीओ संचालक, (DRDO Director) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरला (Pradeep Kurulkar) जामीन दिल्यास तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येईल, अशी भीती व्यक्त करीत सरकार पक्षाने जामिनासाठी विरोध केला आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी कुरुलकरला अटक करण्यात आली आहे.  सध्या तो येरवडा कारागृहात आहे. कुरुलकरने वकील ॲड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला आहे. कुरुलकरच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

कुरुलकरला जामीन देऊ नये. तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे.  तपासात बाधा येईल, असे विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले. कुरुलकरचा मोबाइल संच तपासणीसाठी गुजरात येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. कुरुलकरने मोबाइलमधील विदा खोडला आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून खोडून टाकलेला विदा पुन्हा मिळवायचा आहे. याप्रकरणाचा तपास करायचा असल्याने कुरुलकरचा जामीन फेटाळण्यात यावा, अशी विनंती ॲड. फरगडे यांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. कुरुलकरच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest