Pune Crime News : सख्खा काका बनला नराधम... अल्पवयीन पुतणीसोबत केले दुष्कर्म

पीडित मुलीच्या काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. २२ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी त्यांच्या दुकानात शेजारील खोलीमध्ये झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 24 Oct 2023
  • 03:06 pm
Pune Crime News : सख्खा काका बनला नराधम... अल्पवयीन पुतणीसोबत केले दुष्कर्म

सख्खा काका बनला नराधम... अल्पवयीन पुतणीसोबत केले दुष्कर्म

पुणे : सख्या काकानेच आपल्या १६ वर्षीय पुतणीवर जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणीकंद येथे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी चुलत्या विरोधात बलात्कार, (Crime News) विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Sexual Abuse Act) हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२३ आणि जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये घडला. (Lonikand) याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पीडित मुलीच्या काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांचा सख्खा भाऊ आहे. २२ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी त्यांच्या दुकानात शेजारील खोलीमध्ये झोपलेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तिची आई त्या ठिकाणी धावत गेली. त्यावेळी तिने हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ पीडित मुलीला बाजूला ओढले आणि तिचा बचाव केला.

मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या सोबतच आरोपीने २०२२ सालामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest