Pune Crime News : बाल सुधार गृहात अल्पवयीन मुलावर बलात्कार

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लोहगाव पोलीस (Lohgaon Police) ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर बालसुधारगृहातील तीन तरुणांनी नैसर्गिक बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लोहगाव पोलीस (Lohgaon Police) ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर बालसुधारगृहातील तीन तरुणांनी नैसर्गिक बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

शंकर उर्फ शंकू अर्जुन जाधव (वय १८), अमित रामभवन यादव (वय १८), राज राजेश शर्मा (वय १८, रा. पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलाने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा मिरजच्या लोहगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. त्याला सांगलीच्या बाल न्यायमंडळाने पुण्यातील सुधारगृहात ठेवले आहे.

या ठिकाणी तीन आरोपी देखील राहतात. आरोपींनी त्याच्या तोंडात साबण कोंबून तिघांचे कपडे धुवायला भाग पाडले. तसेच, त्याच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक चाळे केले. या मुलाने त्यांना विरोध केला. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी त्याचा सादरीने गाळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कपडे काढून तिघांनीही त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. तसेच, कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest