पुणे: शिक्षिकेचा विनयभंग; उपमुख्याध्यापक दोन वर्षांच्या कारावासात

पुणे : एका उपमुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासासह एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्याला १५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Teacher Molested, Vice Principal imprisonment, Suresh Pandurang Sawant, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

न्यायालयाने सुनावली शिक्षा, भरावा लागणार १५ हजारांचा दंड

पुणे : एका उपमुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासासह एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्याला १५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. लष्कर न्यायालयाचे सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकारे यांनी याबाबतचे आदेश दिले. ही घटना जुलै २०१७ मध्ये मांजरी येथील एका शाळेत घडली होती.

सुरेश पांडुरंग सावंत (रा. हडपसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी एका शिक्षिकेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मांजरीमधील एका शाळेत जुलै २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत त्याला अटक केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सावंत हा मांजरी येथील शाळेत उपमुख्याध्यापक पदावर काम करीत होता. सावंत याने पीडित शिक्षिकेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, सतत कोणते नाम कोणते कारण काढून या शिक्षिकेला त्याचा कार्यालयात बोलावून घेत होता. त्याने अनेकदा या शिक्षिकेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या शिक्षिकेकडे तो वाईट नजरेने पाहायचा असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

सावंत याने १७ जुलै रोजी पिडीत शिक्षिकेला मदत करण्याचा बहाणा करून स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले. तिच्याशी बोलण्याचा बहाणा करून अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या खटल्यात सहायक सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यात दोन साक्षीदार फितूर झाले. शिक्षिकेची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सावंतला शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी सुप्रिया गावडे यांनी केला होता.

Share this story

Latest