पुणे हादरले ! पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, सहायक पोलीस आयुक्ताने स्वत:ही केली आत्महत्या

पुण्यातील बालेवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केला आहे. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बालेवाडी परिसरात पहाटे चारच्या सुमारास घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 24 Jul 2023
  • 10:57 am
 Assistant Commissioner : पुणे हादरले ! पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, सहायक पोलीस आयुक्तांने स्वत:ही केली आत्महत्या

सहायक पोलीस आयुक्ताने स्वत:ही केली आत्महत्या

पुण्यातील बालेवाडी परिसरातील धक्कादायक घटना

पुण्यातील बालेवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्नी आणि पुतण्यावर पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून केला आहे. पत्नी आणि पुतण्याचा खून करून सहायक पोलीस आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बालेवाडी परिसरात पहाटे चारच्या सुमारास घडली आहे.

भारत गायकवाड असे सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आहे. तर पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त आहेत. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड, त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. शनिवारी सुट्टी असल्याने गायकवाड पुण्यात आले होते.

रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, हत्या आणि आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चतु:शृंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest