संग्रहित छायाचित्र
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने कारवाई केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबरला एका कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केसनंद फाट्यावरील साई ब्रँड होम येथे त्यांच्या कंपनीचे बनावट कपड्यांची विक्री हॉट असल्याची तक्रार दिली. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या दुकानात जाऊन कारवाई केली. हे दुकान गौरव सत्यवान नरवाडे (वय 2७, रा. वाघोली, ता. शिरूर, जि. पुणे) या व्यक्तीचे होते. या दुकानातून आणि गोडाऊन मधून पोलिसांनी 4 लाख 94 हजार 650 रुपये किमतीचे कॉपीराईट केलेला बनावट माल (शर्टस्) जप्त केला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी कॉपी राईट ॲक्ट 1957 च्या कलम 51,63 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेन्द्र मुळीक, युनिट 4 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहेद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, युनिट 6 चे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच युनिट 4 आणि 6 मधील अंमलदार यांच्या पथकाने केली.