सल्लूच्या ‘एक्स’चा लाॅरेन्सला मेसेज

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्सला मेसेज केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या सोमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लॉरेन्सला झूम कॉलद्वारे तिच्याशी बोलण्याची विनंती केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sat, 19 Oct 2024
  • 06:53 pm
Lawrence,Somi Ali ,Salman Khan,ex-girlfriend,media

File Photo

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्सला मेसेज केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या सोमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लॉरेन्सला झूम कॉलद्वारे तिच्याशी बोलण्याची विनंती केली. तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सोमीने या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, तिला राजस्थानमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. सोमीने लॉरेन्सला त्याचा मोबाईल नंबरही मागितला आहे.सोमी आणि सलमान १९१९ ते १९९९ असा दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते. सलमानच्या कुटुंबीयांनी तर तिला सून मानायलसा सुरुवातही केली होती. नंतर मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. ४८ वर्षीय सोमी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे.

सोमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉरेन्सचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘‘हा थेट लॉरेन्स बिश्नोईला संदेश आहे. हॅलो, लॉरेन्स भाऊ. तुरुंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकले आणि पाहिले आहे, त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया मला सांगा की हे कसे होऊ शकते? 

संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे, पण आधी तुमच्याशी झूम कॉल आणि काही गोष्टी ठरवू या. माझ्यावर विश्वास ठेवा की हे फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. मला तुमचा मोबाईल नंबर द्या, माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यावर खूप उपकार होईल. धन्यवाद.’’

सोमी ही पाकिस्तानी-अमेरिकन अभिनेत्री असून तिने नव्वदच्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पाकिस्तानात जन्मलेली सोमी आता अमेरिकेत राहते.  ब्रेकअपनंतर काही वर्षांनी सोमीने सलमानवर मारहाण आणि फसवणुकीचा आरोप केला होता. असे असतानाही या वर्षी सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा सोमीने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सलमानच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागण्यास तयार असल्याचे लिहिले होते.

सोमी आणि सलमानने नव्वदच्या दशकात 'बुलंद' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातून सोमी डेब्यू करणार होती. या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग पूर्ण झाले असून निर्माते १९९३ मध्ये रिलीज करणार होते. मात्र, शूटिंगदरम्यान निर्माता रफी काझी यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर चित्रपट आधी अडकला आणि नंतर रखडला.

गुजरातच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बऱ्याच दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. अलीकडेच त्याच्या टोळीने सलमानचा जवळचा मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली आहे. यापूर्वीही लॉरेन्स गँगने सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. सलमानसोबत काम करणारा गायक एपी ढिल्लन यांच्या कॅनडातील घराबाहेरही लॉरेन्स टोळीने गोळीबार केला होता.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest