संग्रहित छायाचित्र
पुण्यात गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. डायस प्लाट परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी सरोदे याची हत्या केली. ७ जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी सरोदेने त्याला मारहाण केली होती. त्या रागातून मंगळवारी रात्री कांबळे बंधू त्याच्या घरी गेले. त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेश याला मारहाण सुरू केली. त्यावेळी सुनील मध्ये आला. आरोपीने कोयता काढून त्याच्या गळ्यावर वार केला. एकाच घावात सुनील गतप्राण झाला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.