Suspended : पुणे पोलीस दल हादरले, ससून ड्रग्सप्रकरणात तब्बल ९ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

मोठ्या गुन्हेगाराच्या बाबतीत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 3 Oct 2023
  • 06:12 pm
Suspended : पुणे पोलीस दल हादरले, ससून ड्रग्सप्रकरणात तब्बल ९ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुणे पोलीस दल हादरले, ससून ड्रग्सप्रकरणात तब्बल ९ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, मोठ्या गुन्हेगाराच्या बाबतीत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पुणे शहर पोलीस दल चांगलेच हादरले आहे.

ललित पाटील ड्रग्स विक्रीत चौघे कर्मचारी तर ललित पाटीलची ससूनमधून पलायन प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जण अशा एकून ९ जणांचे निलंबन कऱण्यात आले आहे. यामध्ये पीएसआय जनार्दन काळे, पोलीस अंमलदार विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्स माफिया ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ललित पाटील यांच्या छातीत दुखत असल्याचे कारण एक्स-रे काढण्यासाठी ससून रुग्णालयातील वॉर्ड मध्ये गेला होता. ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक १६ येथे एक्स-रे काढण्याच्या बहाण्याने गेल्यानंतर मागच्या आऊट गेटने तो बाहेर पडला. पाटील हा रुग्णालयातून बाहेर पडून पुणे स्टेशनच्या दिशेने पळाला.

ललित पाटील याचा शहरातील ड्रग्स रॅकेटमध्ये मोठा हात असल्याचा संशय पुणे पोलिसांना होता. यामुळेच तो येरवडा जेल येथे कैदेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० सप्टेंबरला ललित ससून रुग्णालयात असतानाच प्रवेशद्वारावर दोन कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले होते. यानंतर ड्रग्सचे मोठे रॅकेट ललित पटेल चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलीस तपास देखील करत होते. मात्र आता ललित पाटील हा पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन, येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलीस यांच्या संगनमताशिवाय शक्य आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest