पुणे कस्टम विभागाने १० कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

पुण्यात कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ हजार ३३ किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट केला आहे. या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत १० कोटी रुपयांच्या वर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 20 Jun 2023
  • 11:24 am
पुणे कस्टम विभागाने १० कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

पुणे कस्टम विभागाने १० कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

अमली पदार्थ कारवाई एकूण १९ जणांना अटक

पुण्यात कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ हजार ३३ किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट केला आहे. या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत १० कोटी रुपयांच्या वर आहे. नष्ट केलेले अमली पदार्थ ७ जिल्ह्यातील कारवाईतील आहेत. या प्रकरणी पोलीसांनी १९ जणांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या सात जिल्ह्यात कस्टम विभगाने कारवाई करून अमली पदार्थ जप्त केले होते. यामध्ये गांजा, चरस, मेफेड्रोन, कोकेनचा इत्यादींचा समावेश आहे. हा सर्व मुद्देमाल गेल्या वर्षभरात पोलीसांनी जप्त केला होता.

या कारवाईमध्ये पोलीसांनी एकूण १९ जणांना अटक केली आहे. या पदार्थावर योग्य त्या रासायनिक प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलीसांनी १ हजार ३३ किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट केला आहे. हा एकूण १० कोटी रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest