संग्रहित छायाचित्र
बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने खात्यातून १२ लाख ९० हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली आहे.
मनोज बाळाराम मुप्पीड (वय ५७, रा. येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांना राहत्या घरी मोबाइलद्वारे संपर्क साधला. आपण एका राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकृत व्यक्ति असल्याचे आरोपीने भासवले. फिर्यादी यांचे केवायसी अपडेट नसल्याने त्यांचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच खाते पुढे चालु ठेवण्यासाठी एपीके फाइल पाठवून त्यांना केवायसी अपडेट करण्यासाठी सांगण्यात आले. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या बँक खात्यामधून १२ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेतले.