संग्रहित छायाचित्र
पोलीस असल्याची बतावणी करत एका तरुणाची ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मोहित मोहन शेवडे (वय २९, रा. पाषाण रोड, पुणे) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात मोबाइल वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरला फिर्यादी यांना राहत्या घरी फोन करून आरोपीने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांच्या विरोधात मनी लॉड्रिंगची केस असल्याचे सांगून चौकशीच्या बहाण्याने कट रचून फिर्यादी यांना एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ४ लाख ६० हजार रुपये पाठवले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक ननवरे तापस करत आहेत.