संग्रहित छायाचित्र
शहरात घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहे. बंद घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेला जात आहे. अशाच प्रकारची एक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. या भागातील एका कुलूपबंद बंगल्यातून कपाटातील १२ लाख ४० हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.
एका महिलेने याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वडगाव बुद्रुक भागातील वेणूताई महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या बंगल्यात ही चोरीची घटना घडली. तक्रारदार महिलेचे आईवडील देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडले. बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून त्यांनी १२ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस पुढील तपास करत आहे.