Pune Crime : पुण्यात खळबळ ! निवृत्त पोलिसाच्या मुलाची सपासप वार करत हत्या

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. आज सायंकाळच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ ते ५ जणांच्या टोळक्यांनी वार करत तरुणाची हत्या केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 29 Sep 2023
  • 08:47 pm
Pune Crime : पुण्यात खळबळ ! निवृत् पोलिसाच्या मुलाची सपासप वार करत हत्या

निवृत्त पोलिसाच्या मुलाची सपासप वार करत हत्या

४ ते ५ जणांच्या टोळक्याने केली हत्या

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. आज सायंकाळच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ ते ५ जणांच्या टोळक्यांनी वार करत तरुणाची हत्या केली आहे.

विजय ढुमे असे हत्या झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे नाव आहे. सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमधून बाहेर येताच टोळक्यांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. विजय हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध होते. तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते.

विजय ढुमे हा मूळचा सासवड येथील ढुमेवाडी चा रहिवासी होता. त्याचे वडील पुणे पोलीस दलात गुन्हे शाखा, व्हिजीलन्स आणि निवृत्ती वेळी निगडी वाहतूक शाखेत कार्यरत होते. ढुमे गेल्या ३० वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये राहायला होता. हॉटेल व्यवसाय, बांधकाम क्षेत्र आणि राजकीय लोकांशी संबंधित होता. राज्यातील अनेक विख्यात आणि कुख्यात लोकांशी त्याची उठबस होती. हॉटेल वादातून त्याच्यावर काही वर्षांपूर्वी त्याच्यावर पिंपरीत एक गुन्हा दाखल झाला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest