पुणे : जिल्हा परिषदेच्या आवारात हाणामारी- माहिती अधिकार कार्यकर्त्याला एकाकडून मारहाण

जिल्हा परिषदेच्या आवारात माहिती अधिकार कार्यकर्त्याला एका मुक्त पत्रकाराने मारहाण केल्याची घटना घडली. मुक्त पत्रकाराने केलेल्या मारहाणीत माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दात पडला असून, याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 27 Apr 2024
  • 07:05 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : जिल्हा परिषदेच्या आवारात माहिती अधिकार कार्यकर्त्याला एका मुक्त पत्रकाराने मारहाण केल्याची घटना घडली. मुक्त पत्रकाराने केलेल्या मारहाणीत माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दात पडला असून, याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याप्रकरणी राहुल बानगुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बानगुडे मुक्त पत्रकार आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते भैय्यासाहेब जगन्नाथ शिंदे (वय ५२, रा. वरकुटे बुद्रुक, लोणी देवकर ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. ते जिल्हा परिषद कार्यालयात माहिती अधिकारात माहिती घेण्यासाठी अर्ज घेऊन आले होते. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेत राहुल बानगुडे याने त्यांच्याकडे अर्जाची प्रत मागितली. शिंदे यांनी त्याला प्रत देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. बानगुडेने शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत बानगुडेने शिंदेच्या तोंडावर बुक्की मारली. मारहाणीत शिंदे यांचा एक दात पडल्याने ते जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest