PUNE: केंद्रीय यंत्रणेच्या नावाने महिलेला दोन कोटींचा गंडा ; सायबर चोरट्यांनी भीती दाखवत उकळली रक्कम

पुणे : एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘स्काईप आयडी’वरुन संपर्क साधून ‘फेडेक्स’ कुरियरमधून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेला तब्बल दोन कोटी आठ लाख रुपयांना गंडवण्यात आले. त्यांच्या नावाने पाठवण्यात आलेल्या कुरियरमध्ये ‘एलएसडी’ नावाचा अमली पदार्थ असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी या महिलेला केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने विविध बँक खात्यांवर पैसे भरायला सांगण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

पुणे : एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘स्काईप आयडी’वरुन संपर्क साधून ‘फेडेक्स’ कुरियरमधून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेला तब्बल दोन कोटी आठ लाख रुपयांना गंडवण्यात आले. त्यांच्या नावाने पाठवण्यात आलेल्या कुरियरमध्ये ‘एलएसडी’ नावाचा अमली पदार्थ असल्याचे सांगत कारवाई टाळण्यासाठी या महिलेला केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने विविध बँक खात्यांवर पैसे भरायला सांगण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात स्काईप आयडीधारक, विविध बँकेचे खातेधारक यांच्यावर भादवि ४१९, ४२०, ३४, आयटी अॅक्ट (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही महिला कोरेगाव पार्क येथील गेरा क्लासिक या आलीशान सोसायटीत राहण्यास आहे. सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या मोबाईलवर २६ एप्रिल रोजी मोबाईलवर संपर्क साधण्यात आला.  संबंधित व्यक्तीने तो फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून बोलत असून त्याचे नाव  आकाशकुमार असल्याची बतावणी केली. या महिलेच्या नावे मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून एक पार्सल पाठविण्यात आले होते. हे पाकिट सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले असून त्यामध्ये ‘एलएसडी’ नावाच्या अमली पदार्थांच्या १२० स्ट्रीप आढळून आल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्यामध्ये डॉन किलो कपडे, पाच पासपोर्ट अडकले असल्याची बतावणी केली. याप्रकरणी मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आल्याची भीती त्याने घातली. 

याप्रकरणी कायदेशीर कारवाई होणार असून अटक होण्याची शक्यता असल्याचे भय त्याने निर्माण केले. कारवाई टाळायची असेल तर स्काईप आयडी डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. आरोपींनी लिंक पाठवित स्काईप एप डाऊनलोड करण्यास सांगितले. या महिलेने हे एप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती सायबर चोरट्यांनी मिळवली. बँक खात्यांच्या माहितीची  पडताळणी करण्यासाठी खात्यातील सर्व पैसे आपल्या खात्यात पाठवण्यास आरोपींनी सांगितले. कारवाईच्या भीतीने घाबरलेल्या या ज्येष्ठ महिलेने आरोपीच्या सांगण्यावरून खात्यावरील दोन कोटी ८ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यांचा मोबाईल ब्लॉक केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.  फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest