PUNE: जिल्हा मध्यवर्ती बँक उशिरापर्यंत सुरू ठेवणे भोवले; निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून वेल्हा शाखेतील व्यवस्थापकावर गुन्हा

लोकसभा निवडणुकीच्या काळात बारामती मतदारसंघात आरोपांची राळ उठली आहे. त्यातच पैशांच्या वाटपाचे आरोप करण्यात आले. तशा व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मिडियावर प्रसारीत करण्यात आल्या.

Image Source: Rohit Pawar ‘X’ account

लोकसभा निवडणुकीच्या काळात बारामती मतदारसंघात आरोपांची राळ उठली आहे. त्यातच पैशांच्या वाटपाचे आरोप करण्यात आले. तशा व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मिडियावर प्रसारीत करण्यात आल्या. वेल्हा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची (पीडीसीसी) शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. याविषयी तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune District Central Cooperative Bank)

बँक व्यवस्थापक विनायक तेलावडे यांच्याविरुध्द भादवि १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रमेश अजिनाथ बेलेकर (वय ३५, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलेकर हे वेल्ह्यात कृषी सहायक म्हणून काम करतात. त्यांची वेल्हे तालुक्यात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. बेलेकर हे त्यांच्या पथकातील तुषार तडवी आणि सहकारी असे सर्वजण सोमवारी पहाटे चारच्या सुमारास गस्त घालत होते. रोहित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे शाखा रात्री बारानंतर सुरू असल्याची माहिती ‘एक्स’वर पोस्ट करीत दिली होती. त्यानंतर भरारी पथक तेथे पोहोचले.

भरारी पथकाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता बँक व्यवस्थापकांच्या कक्षाबाहेर ४० ते ५० जण थांबलेले आढळून आले. व्यवस्थापक तेलावडे यांच्याशी संपर्क साधत बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासायचे असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे विभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या परवानगीने पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा सीसीटीव्ही चित्रीकरणात ४० ते ५० जण बँकेत असल्याचे आढळून आले. बँकेची वेळ संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर बँक सुरू ठेवण्यात आल्याचे समोर आले. तसेच आयोगाच्या आदेशाचा भंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest