‘ती’ विद्यार्थिनी सीओईपीतून निलंबित; तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृहातील आरोपी विद्यार्थिनीने रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून केले होते व्हायरल

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनानेदेखील या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असून त्या विद्यार्थिनीची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

पोलिसांत तक्रार, चौकशी समिती स्थापन

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनानेदेखील या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असून त्या विद्यार्थिनीची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी होईर्पंत तिला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले आहे.

सीओईपी ही एक देशातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक संस्था आहे. या महाविद्यातील मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो तिच्याच रुममेटने व्हायरल केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर करीत याची माहिती दिली होती.

‘‘मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ते बाहेर पसरवत आहेत, ही बाब समोर आल्यानंतर ७२ तास उलटूनही महाविद्यालय प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. दोषींना पाठीशी घालत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे,’’ अशी पोस्ट पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने रविवारी (दि. ५) संध्याकाळी ‘एक्स’वर टाकली होती.

त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर पीडित विद्यार्थिनीने या विषयाला वाचा फोडून न्याय मागितला. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आपेक्षित होते. मात्र प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने या विषयावर जाहीर बोलण्याची वेळ आली, असे पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने सांगितले.

 सीओईपी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी पोलिसांकडे त्यांच्या एका रूममेटची तक्रार केली आहे. संबंधित तरुणी त्यांच्या नकळत खोलीतील मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढत होती. तसेच ती विद्यापीठाच्या आवाराबाहेर  आणि विशिष्ट लोकांना पाठवत होती, असे तक्रारीत नमूद केल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. या प्रकरणावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होऊ लागल्याने तसेच दबाव वाढू लागल्याने विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

याप्रकरणी ‘सीविक मिरर’ला माहिती देताना सीओईपी विद्यापीठाचे कुलसचिव डी. एन. सोनावणे म्हणाले, ‘‘सीओईपी विद्यापीठातील आरोपी विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत तिला विद्यापीठातून निलंबित केले आहे. सीओईपी प्रशासन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुरक्षित ठिकाणी शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थिंनीना सुरक्षित वातावारण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest