वारजे गोळीबार प्रकरण: पुण्यातील आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

मतदान झाल्यानंतर पुण्यातील वारजे भागात गोळीबार करणाऱ्या सराईताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने अटक केली आहे.

Warje Firing Case

संग्रहित छायाचित्र

मतदान झाल्यानंतर पुण्यातील वारजे भागात गोळीबार (Warje Firing Case) करणाऱ्या सराईताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असून, पैसे घेऊन हवेत गोळीबार केल्याचे कबुली त्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे (Pimpri Chinchwad Police) दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून या सराईताला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest