सीओईपी गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढून केले व्हायरल; दोघांविरोधात गुन्हा दाखल !

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे हॉस्टेलमध्ये आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे हॉस्टेलमध्ये आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत अजित सुराणा (रा. हिंजवडी फेज १) आणि आर्या गिरीष काळे (रा.सीओईपी गर्ल्स हॉस्टेल, शिवाजीनगर) यांच्या विरोधात भादंवि ३५४ (क), ३४ आयटी एक्ट ६७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अवनी लोंढे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.

सीओईपी गर्ल्स हॉस्टेलमध्ये (COEP Girls Hostel) महिला आरोपी हिने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रूममेट असलेल्या ३ विद्यार्थिनींचे चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो काढले. त्यानंतर ते आरोपी विनीत सुराणा याला मोबाईलवर फॉरवर्ड झाले. आरोपीने व्हॉटस्अप कॉल करून हे फोटो पाठवण्यास सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी एक्स सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एका विद्यार्थिनीने याबाबत पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणी संबंधित पिडीत विद्यार्थिनींसह अन्य विद्यार्थिनींनी सीईओपी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डी.एन. सोनावणे यांनी लेखी खुलासा करत चौकशी समिती स्थान केल्याचे स्पष्टीकरण केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest