संग्रहित छायाचित्र
लोणीकंद पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार एका ३२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध वाघोली पोलिस चौकीत तक्रार अर्ज देण्यात आला होता. या तक्रार अर्जाबाबत त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी आणि भविष्यात त्रास न देण्यासाठी सहाय्यक निरीक्षक थोरबोले यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयात दिली,अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केल्यानंतर थोरबोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.