Pune Crime News : व्यावसायिक अभय संचेती यांची लाखोंची फसवणूक

अन्नधान्य आणि डाळींचे होलसेल विक्रेते अभय संचेती यांच्या दुकानामधून ४८ लाख रुपयांचा माल घेऊन त्याचा व्यापार करून ही उधारी न चुकवता बालाजी ट्रेडिंग कंपनी मार्केट यार्ड आणि पिंपरी चिंचवड, काळेवाडी येथील व्यापारी फरार झाले आहेत.

Pune Crime News : व्यावसायिक अभय संचेती यांची लाखोंची फसवणूक

व्यावसायिक अभय संचेती यांची लाखोंची फसवणूक

उधारीवर माल खरेदी करून बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक पसार

पुणे : अन्नधान्य आणि डाळींचे होलसेल विक्रेते अभय संचेती यांच्या दुकानामधून ४८ लाख रुपयांचा माल घेऊन त्याचा व्यापार करून ही उधारी न चुकवता बालाजी ट्रेडिंग कंपनी मार्केट यार्ड आणि पिंपरी चिंचवड, काळेवाडी येथील व्यापारी फरार झाले आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड (Market Yard) पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार जून २०१९ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडला.

याप्रकरणी पोकरराम मेवाराम चौधरी (रा. राजस्थान), हनुमान किरताराम चौधरी (रा. राजस्थान) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभय बन्सीलाल संचेती (वय ६३, रा. पारसनीस कॉलनी, आदर्श बंगला, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. अभय संचेती यांचे मेसर्स बन्सीलाल लखीचंद संचेती जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट तसेच मेसर्स पन्नालाल बन्सीलाल या नावाने मार्केट यार्ड येथील किराणा व भुसार मालाच्या बाजारात धान्य व भुसार गाळे आहेत. आरोपी पोकराराम मेवाराम चौधरी याने पुणे सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड सिनेमागृहाच्या जवळ बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाने अन्नधान्याचे दुकान थाटले होते.

चौधरी याने अभय संचेती यांच्या फर्म मधून ३१ लाख ५७ हजार ७२० रुपयांचा माल उधारीवर खरेदी केला होता. या मालाचे पैसे हळूहळू परत करू असे त्यांनी सांगितले होते. मात्र २०१९ पासून आज पर्यंत यातील पैसे परत न करता तसेच संचेती यांच्याशी कोणताही संपर्क न करता पोकरराम चौधरी पसार झाला. त्याने पैसे बुडविण्याच्या हेतूने निघून गेला जाऊन ३१ लाख ५७ हजार ७२३ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच अभय संचेती यांनी हनुमान कीरताराम चौधरी याच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे. हनुमान चौधरी याचे रहाटणी गावठाणामध्ये आणि काळेवाडी या ठिकाणी श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान होते. हनुमान चौधरी याने देखील संचेती यांच्या बन्सीलाल लखीचंद संचेती जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट तसेच मेसर्स पन्नालाल बन्सीलाल या नावाने असलेल्या दुकानामधून १६ लाख २९ हजार ८०२ रुपयांचा माल विश्वासाने उधारीवर खरेदी केला होता. त्याने देखील या मालाचे पैसे परत केलेले नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता  चौधरी देखील पसार झाला आहे. हनुमान चौधरी आणि पोकरराम चौधरी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या दोघांचा मार्केट यार्ड पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest