धानोरीतील वेश्याव्यवसायावर पोलीसांचा छापा, तीन महिलांची सुटका

पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा प्रकार पुण्यातील धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी सुरू होता. या कारवाईत पोलीसांनी तीन महिलांची सुटका केली आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 7 Jul 2023
  • 02:58 pm
धानोरीतील वेश्याव्यवसायावर पोलीसांचा छापा, तीन महिलांची सुटका

संग्रहित छायाचित्र

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केली कारवाई

पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा प्रकार पुण्यातील धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी सुरू होता. या कारवाईत पोलीसांनी तीन महिलांची सुटका केली आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.

रंजना सनातून सिंगदेवी (वय ३५, रा. धानोरी, पुणे, मूळ राहणार आसाम) या महिलेस अटक करण्यात आली आहे. तर तिचे साथीदार सुरेश शाहू आणि पूजा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील महादेवनगर या ठिकाणी गुडविल स्क्वेअर येथील प्रीमियम युनिक सलूनमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पाच सेंटरवर छापा टाकून पीडित तीन महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका करताना आरोपी मिळून आलेले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest