पिंपरी-चिंचवड : नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुळा नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ मार्च रोजी पिंपळे निलख येथे करण्यात आली असून याप्रकरणी बुधवारी (२४ एप्रिल) सांगवी पोलीस (Sangvi Police) ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

मुळा नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ मार्च रोजी पिंपळे निलख येथे करण्यात आली असून याप्रकरणी बुधवारी (२४ एप्रिल) सांगवी पोलीस (Sangvi Police) ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Pimpri chinchwad Crime)

हरिभाऊ काळूराम साठे (वय ६२), ज्ञानोबा काळूराम साठे (वय ६५), अमोल बबन साठे (वय ५५), लक्ष्मण कोंडीबा कामठे (वय ६०), सुभाष कोंडीबा कामठे (वय ५८, सर्व रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वप्निल मनोहर पाटील (वय ३८, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राडारोडा टाकण्यास तसेच नदी प्रदूषण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असताना देखील आरोपींनी बांधकामाचा राडाराडा मुळा नदीमध्ये टाकला. यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest