पुणे : नाशिक-जळगावमधून सराईत चोरटे जेरबंद; मुंढवा पोलिसांकडून सोनसाखळी चोरट्यांना बेड्या

रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपींना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांना नाशिक आणि जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Crime News

पुणे : नाशिक-जळगावमधून सराईत चोरटे जेरबंद; मुंढवा पोलिसांकडून सोनसाखळी चोरट्यांना बेड्या

पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपींना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांना नाशिक आणि जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी दिली. (Pune Crime News)

राहूल विजय भावसार (वय ३८, रा. आडगाव, जि. नाशिक) आणि धिरज अशोक जैन (वय ३४, रा. गांधी चौक, चोपडा, जळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधवी श्रीनिवास गंपा (वय ३८, रा. बी. टी. कवडे रस्ता) या बी. टी. कवडे रस्त्याने ९ एप्रिल रोजी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. त्यांचे २ लाख ४५ हजारांचे सोनसाखळी असलेले मंगळसूत्र, गळ्यातील लक्ष्मीचे कॉईन हिसकाण्यात आले होते. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बाळकोटगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी करून तपासाला सुरुवात केली होती.  

या परिसरातील व आजूबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले होते. तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण करुन आरोपींची माहिती मिळवली. दोन्हीही आरोपी नाशिक व जळगाव जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम, सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उप-निरीक्षक अनिल बिनवडे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश (नाना) भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत पेरणे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर, किरण बनसोडे यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest