‘एकतर तुम्हाला संपवेन किंवा मी आत्महत्या करेन’

खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवून देतो असे सांगून एकाकडून एक लाख ४३ हजार रुपयांची रक्कम घेतली. पैसे घेतल्यानंतरही प्रवेश मिळवून दिला नाही. प्रवेश नाही, तर पैसे पुन्हा कर असे सांगितल्यावर त्याने पैसे देण्यास नकार दिला.

‘एकतर तुम्हाला संपवेन किंवा मी आत्महत्या करेन’

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी दिलेले पैसे परत मागितल्यावर आरोपीने दिली धमकी

खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवून देतो असे सांगून एकाकडून एक लाख ४३ हजार रुपयांची रक्कम घेतली. पैसे घेतल्यानंतरही प्रवेश मिळवून दिला नाही. प्रवेश नाही, तर पैसे पुन्हा कर असे सांगितल्यावर त्याने पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर त्याने एकतर तुम्हाला संपवेन किंवा मी स्वत: आत्महत्या करेन, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी एनडीए येथील कोंढवे धावडे येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. शीतल प्लाझा, कात्रज-कोंढवा रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी घाटपांडे यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. फिर्यादीच्या मुलीला खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश हवा होता. त्यांनी आरोपीशी संपर्क साधला असता, आरोपीने तुमच्या मुलीला पहिलीत प्रवेश मिळवून देतो असे सांगून वेळोवेळी पैशांची मागणी केली. केंद्रीय विद्यालयात मुलीला पहिलीत प्रवेश मिळेल या आशेने फिर्यादीने आरोपीला पैसे दिले. तसेच फिर्यादी आणि आरोपी वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटले. त्यावेळी आरोपीला त्यांनी एक लाख ४३ हजार रुपये दिले होते. या सोबतच फिर्यादीसह त्याच्या ओळखीतील आणखी काहीजणांनी आरोपी घाटपांडेला पैसे दिले होते. पैसे घेतल्यानंतर आरोपीकडून प्रवेशाचे काम होत नव्हते. त्यामुळे फिर्यादीने त्याच्याकडे पैसे परत मागितले. पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने घाटपांडेला जाब विचारला. तेव्हा ‘एक तर मी तुम्हाला संपवून टाकेन किंवा मी आत्महत्या करेल’, अशी धमकी आरोपी घाटपांडेने त्यांना दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेतली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest