पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका; म्हाळूंगेमधून गावठी दारुसह २ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने म्हाळुंगे गावाच्या हद्दीत छापा टाकत गावठी दारु आणि एक मोटार असा २ लाख ६८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Pune Crime News

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका; म्हाळूंगेमधून गावठी दारुसह २ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

विभागीय पथकाकडून ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने म्हाळुंगे गावाच्या हद्दीत छापा टाकत गावठी दारु आणि एक मोटार असा २ लाख ६८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, विभागीय भरारी पथकाद्वारे ८६ हजार ३५९ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

या मोटारीमधून ३५ लीटर क्षमतेच्या १२ प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे ४३ हजार २०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध सूरू असून आरोपी विरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए)(ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई डी विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, शीतल देशमुख, सागर ध्रुवे जवान संजय गोरे, राजू पोटे, शुभम मुंढे व वाहन चालक राऊत यांच्या पथकाने पार पाडली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाद्वारे गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मीती, विक्री, तसेच अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे मारुन ८६ हजार ३५९ किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात विभागाच्यावतीने अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने १ ते ४ मे या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली. विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यामधील विविध ढाब्यांवर छापे मारुन ६ वारस व २ बेवारस असे एकुण ८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्हयांमध्ये एकुण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात एकूण १६ लिटर देशी दारु, ८ लिटर विदेशी मद्य, १८ लिटर बिअर तसेच गावठी हातभट्टी दारु २६ लिटर व १ हजार ८०० लिटर गावठी हातभट्टी दारु निर्मितीचे रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने, जवान ए. आर. थोरात, पी. टी. कदम, एस.एस.पोंधे, एस.सी. भाट व आर.टी. ताराळकर यांनी सहभाग घेतला आहे. यापुढेही अशाच प्रकारे मोहिमा राबवून अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest