पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार वाढतच असल्याचे दिसून येत आहे. कमी वेळेत अधिक पैसे मिळतील या आमिषाला बळी पडून लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे ताजी असतानाच शहरातील दोन महिलांसह एकाला तब्बल ३९ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार वाढतच असल्याचे दिसून येत आहे. कमी वेळेत अधिक पैसे मिळतील या आमिषाला बळी पडून लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे ताजी असतानाच शहरातील दोन महिलांसह एकाला तब्बल ३९ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात संबंधितांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) 

धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेने फसवणूक झाल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग करून पैसे मिळवण्याच्या बहाण्याने फिर्यादी महिलेच्या बॅंकेच्या वेगवेगळ्या दोन खात्यामधून १० लाख ३१ हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न दिला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार २१ डिसेंबर २०२३ ते २१ मार्च २०२४ या दरम्यान घडला.  महिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम भजनावले करत आहेत.

शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून गेण्याच्या बहाण्याने बाणेर परिसरात राहणाऱ्या पांडुरंग रामचंद्र तावरे (वय- ६१) यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी तावरे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्य्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष सायबर चोरट्यांनी तावरे यांना दाखवले. चोरट्यांनी तावरे यांच्या व्हॅट्सऍप क्रमांकावर   यांना संपर्क साधला. त्याला तावरे यांनी प्रतिसाद दिला असता शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कशाप्रकारे चांगला परतावा मिळेल याचे आमिष दाखवले. चांगले पैसे मिळतील या आमिषाला बळी पडून तावरे यांनी पैसे गुंतवण्याची तयारी दाखवली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादी यांनी अप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. मात्र पैसे मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार ७ जानेवारी ते २७ मार्च यादरम्यानच्या काळात घडला आहे. तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.

लोणीकाळभोर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा सायबर चोरट्यांनी फेसबुकवरून संपर्क साधला. त्या महिलेचा विश्वास संपादन करुन त्यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून या महिलेने ३ लाख ४१ हजार रुपये गुंतवले. मात्र त्यांनतर कोणताही परतावा मिळाला नाही, तसेच प्रतिसादही मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्याने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ डिसेंबर २०२३ ते फिर्याद दाखल करण्यापूर्वीपर्यंत घडला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest