Pimpri Chinchwad : एकाला घरात घुसून मारहाण, दोघांना अटक

मध्यस्थी केली म्हणून घरात घुसून एकाला घरात घुसून मारहाण केली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री पाचाणे, मावळ येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

एकाला घरात घुसून मारहाण, दोघांना अटक

मावळ : मध्यस्थी केली म्हणून घरात घुसून एकाला घरात घुसून मारहाण केली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (२५ फेब्रुवारी) रात्री  पाचाणे, मावळ येथे घडली. सौरभ दत्तात्रय येवले (Saurabh Yevale) (वय २६, रा. पाचाणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime) 

यावरून पोलिसांनी मंथन कदम (वय २२, रा. पाचाणे) व संदेश कदम (वय २४, रा. पाचाणे) यांना अटक केली आहे, तर विधिसंघर्षीत बालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी तू भांडणात का पडलास, सोडवासोडवी का केली म्हणत फिर्यादी, फिर्यादीचे वडील यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest