पिंपरी-चिंचवड : गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

गुटखा विक्रीप्रकरणी अमली पदार्थ विरोधीपथकाने हिंजवडी परिसरात कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

# हिंजवडी : गुटखा विक्रीप्रकरणी अमली पदार्थ विरोधीपथकाने हिंजवडी परिसरात कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली. (Pimpri Chichwad Crime) 

वर्धाराम पोमाजी चौधरी (वय ३७, रा. भूमकर वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अजित कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भूमकर वस्ती येथे एकजण गुटखा विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वर्धाराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि मोबाईल फोन असा एकूण १७ हजार ७२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest