Jejuri : खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह एकाला अटक

जेजुरी (ता. पुरंदर) (Jejuri) येथील खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोड्या करणाऱ्या (Pune Crime News) सराईत टोळीच्या प्रमुखासह एकाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (Pune Rural Local Crime Branch) शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागिने केले हस्तगत करण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 4 Nov 2023
  • 07:17 pm
Jejuri : खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह एकाला अटक

खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह एकाला अटक

लोणी काळभोर : जेजुरी (ता. पुरंदर) (Jejuri) येथील खंडोबाच्या दर्शनाला येऊन घरफोड्या करणाऱ्या (Pune Crime News) सराईत टोळीच्या प्रमुखासह एकाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (Pune Rural Local Crime Branch) शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागिने केले हस्तगत करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राहुल हिरामण लष्करे (वय २२, रा. काळा खडक, वाकड ता हवेली, जि. पुणे) व अजय एकनाथ चव्हाण (वय २२, रा. जांभळी बुद्रुक, ता. भोर जि. पुणे मुळ रा. खांडवी ता गेवराई जि बीड) यांना अटक करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी-सासवड परीसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हयांमध्ये दुपारचे वेळेस बंद घरांची कडी कोयंडा तोडून घरफोडी चोरी करणेत आलेली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घरफोडी चोरीचे गुन्हयांचे अनुषंगाने तपास सुरू केला असता, जेजूरी व सासवड पोस्टे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची वेळ तसेच गुन्हे पद्धतीमध्ये साम्य होते. त्या अनुषंगाने पथकाने सी.सी.टी.व्ही. तपासले.  तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करत असताना सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार राहुल लष्करे याने केले असून त्याने यापुर्वी अशाप्रकारचे दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत. अशी माहिती मिळाली. तो लाल रंगाचे अपाचे दुचाकी  वरून एका साथीदारासह नसरापुर फाटा परीसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचला व लष्करे आणी  चव्हाण यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी जेजूरीला खंडोबाचे दर्शनासाठी आल्यानंतर वाल्हे व सासवड शहरात सोसायटीतील बंद घरांची कडी कोयंडा तोडून चोरी केली असल्याचे सांगितले. त्याबाबत खात्री करताजेजूरी व सासवड पोलीस ठाण्याचे हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून गुन्हयात चोरी गेलेले चांदीचे पैंजण, जोडवी, नाकातील सोन्याची दोन नथ व मोबाईल फोन, गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल असा एकूण ५६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. आरोपी राहुल हिरामण लष्करे हा सराईत असून त्याचेवर पुणे शहर हद्दीत यापुर्वी पाच गुन्हे दाखल असून तो नवीन साथीदाराला घेवून चोरी करतो.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, प्राण येवले यांनी केली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest