Koregaon Park : कोरेगाव पार्क परिसरात रात्रीचा दणदणाट, चौराहे के पार लाऊंजवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

रात्री उशिरापर्यंत संगीताचा दणदणाट सुरू असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ( रात्री कोरेगाव पार्कमधील चौराहे के पार या कॅफे अँड लाउंजवर छापा टाकून कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 11:17 am
Koregaon Park : कोरेगाव पार्क परिसरात रात्रीचा दणदणाट, चौराहे के पार लाऊंजवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

कोरेगाव पार्क परिसरात रात्रीचा दणदणाट, चौराहे के पार लाऊंजवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

अर्चना मोरे

पुणे : रात्री उशिरापर्यंत संगीताचा दणदणाट सुरू (Koregaon Park) असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारीची दखल (Crime Branch) घेऊन गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ( रात्री कोरेगाव पार्कमधील चौराहे के पार या कॅफे अँड (Pune News) लाउंजवर छापा टाकून कारवाई केली. या रूफटॉप रेस्टॉरंटची साउंड सिस्टीम जप्त केली. मोठ्या आवाजात 105 डेसिबलपेक्षा जास्त संगीत वाजत असल्याने ध्वनिप्रदूषण होत असल्याचे नोंदविले गेले आहे. (Pune Crime News)

कोरेगाव पार्क परिसरातील रहिवाशांच्या तक्रारींनुसार सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई  करण्यात आली. पोलिसांनी 3 लाख रुपये किमतीची साउंड सिस्टीम जप्त केली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त ध्वनिप्रदूषण प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करतील. वस्तुस्थितीची पडताळणी केल्यानंतर  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी  पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करतील.

कोरेगाव पार्कमधील रहिवाशांनी सीविक मिररला दिलेल्या माहितीनुसार त्या चौराहे के पार - कॅफे अँड लाउंज येथे सातत्याने मोठ्या आवाजात संगीत  सुरू असल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक पोटे यांनी सांगितले की,   रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याची तक्रार आल्याने बुधवारी रात्री पोलीसांनी छापा टाकला. तीन लाख रुपये किमतीची साउंड सिस्टीम आणि डीजे मिक्सर जप्त केले. ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest