संग्रहित छायाचित्र
पुणे : देशभरात गाजलेल्या रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट (Ruby Hall Clinic) प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीचे दोन सदस्य डॉ. वत्सला त्रिवेदी (Pune News) आणि डॉ. श्रीरंग बच्चू यांनी काम करण्यास नकार दिला आहे. (Pune Crime News)
महाराष्ट्र सरकारने डॉ. सुरेंद्र माथूर आणि डॉ. सुजाता पटवर्धन या दोन नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. १८ जुलै २०२३ रोजी या समितीची स्थापना करण्यात आली होती. तीन महिन्यांत समितीने अहवाल द्यायचा होता. मात्र, यामध्ये अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. राज्य शासनाने नव्याने आदेश काढत पटवर्धन आणि माथूर यांची नियुक्ती केल्याचे आदेश काढले आहेत.