पुणे पोलिसांचे मिशन ऑल आउट, एकाच दिवसात ६४९ गुन्हेगार आले मिळून

पुणे पोलिसांकडून मिशन ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात पोलीस पथकांची नेमणूक करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. या मिशनमध्ये मंगळवारी एकाच दिवसात १ हजार ८३२ जणांचे चेकिंग करण्यात आले. यामध्ये ६४९ गुन्हेगार मिळून आले आहे. तर एकूण १५९ जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 11:47 am
 Pune Police : पुणे पोलिसांचे मिशन ऑल आउट, एकाच दिवसात ६४९ गुन्हेगार आले मिळून

पुणे पोलिसांचे मिशन ऑल आउट, एकाच दिवसात ६४९ गुन्हेगार आले मिळून

आतापर्यंत एकूण १५९ जणांना पोलीसांनी केली अटक

पुणे पोलिसांकडून मिशन ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात पोलीस पथकांची नेमणूक करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. या मिशनमध्ये मंगळवारी एकाच दिवसात १ हजार ८३२ जणांचे चेकिंग करण्यात आले. यामध्ये ६४९ गुन्हेगार मिळून आले आहे. तर एकूण १५९ जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

यामध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट अंतर्गत ५३ जणांना, मपोका क १४२ प्रमाणे १३ जणांना तर जुगार अॅक्ट अंतर्गात ८२ जणांना अशा एकूण १५९ जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये एकुण ११ आर्म अॅक्ट गुन्ह्यांमध्ये एकुण ११ आरोपी अटक करुन त्यांचेकडुन १ पिस्टल, २ जिवंत काडतुसे, तसेच १० धारदार हत्यारे असा एकुण ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर परिमंडळ १ मध्ये मालमत्तेविरुध्दचे एकुण २ गुन्ह्यातील आरोपी अटक करुन त्यांचेकडुन एकुण ५ लाख ०९ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच मोका गुन्ह्यातील १ व चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. याशिवाय, प्रोव्हिबिशन प्रमाणे २ केसेसे करण्यात आलेल्या असुन आरोपींकडुन १ हजार ७६० रुपयांचा आणि जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण ४ केसेस करुन एका आरोपीला अटक करून ६ हजार ७६० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच परिमंडळ -२ मध्ये एकुण ५ शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन त्यामध्ये एकुण ७ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. जुगार अॅक्ट प्रमाणे ३ केसेस करण्यात आलेल्या असुन त्यामध्ये एकुण ४ आरोपी अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण ३ हजार ५३० रुपयांचा आणि प्रोव्हिबिशनमध्ये एकूण ५ केसेस करुन ५ आरोपींकडुन ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिमंडळ-३ मध्ये एकूण प्रोव्हिबिशनमध्ये ११ केसेस करुन ११ आरोपीकडून १९ हजार ०९० रुपयांचा प्रोव्हिबिशन मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. परिमंडळ-४ मध्ये एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन ६ आरोपींना अटक करुन ८ हजार ९९९ रुपयांचा प्रतिबंधित (गांजा, तंबाखूजन्य गुटखा) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकूण १४ केसेस करण्यात आलेल्या असुन २२ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन एकुण २० हजार २६० रुपये किंमतीचा जुगारामध्ये रोख रक्कम व मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे

प्रोव्हिबिशन अॅक्टप्रमाणे एकूण २२ केसेसमध्ये ३२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ - ५ मध्ये प्रोव्हिबिशन अॅक्ट प्रमाणे एकूण ९ केसेसमध्ये ९ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून १३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर एका गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे पोलीसांनी मिशन ऑल आऊट ऑपरेशन राबवून एकाच दिवसात १ हजार ८३२ जणांचे चेकिंग केले आहे. यामध्ये ६४९ गुन्हेगार मिळून आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest