लोहगाव : पोलीस हवालदाराने संपवले जीवन, वरिष्ठांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप

वाहतूक विभागात कार्यकरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीमध्ये घडली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 7 Jul 2023
  • 11:01 am
Lohgaon: पोलीस हवालदाराने संपवले जीवन, वरिष्ठांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप

पोलीस हवालदाराने संपवले जीवन

झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

पोलीस विभागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक विभागात कार्यकरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीमध्ये घडली आहे. याबाबत सकाळी ४ च्या सुमारास मृत व्यक्तीच्या पत्नी पोलीसांना माहिती दिली. दरम्यान अधिकाऱ्याने पैसे मागितल्याने पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याचा आरोप कुटूंबीयांनी केला आहे.

वैभव दिलीप शिंदे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत होता. सकाळी ४ च्या सुमारास शिंदे यांच्या पत्नीने आत्महत्येबाबत पोलीसांना आणि घरातील इतर सदस्यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शिंदेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

तपासादरम्यान, पोलीसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे.

विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या पैशाच्या मागणीमुळे शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबातील काही सदस्यांनी केला आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलीस तपासात कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest