Lalit Patil case : प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलची मैत्रिण अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 23 Oct 2023
  • 05:04 pm
Lalit Patil case : प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलची मैत्रिण अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ड्रग माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले होते. ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना त्यांनी अटक केली होती. या दोघींनी पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरूवातील अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना चार दिवसांची म्हणजेच २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडी संपल्यानंतर आज दोघींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या. तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचे समोर आले आहे. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता. तसेच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला असल्याचे समोर आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest