पिंपरी-चिंचवड : धान्य देण्याच्या बहाण्याने दागिने पळवले

धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेला घेऊन जात तिच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर धान्य आणतो म्हणून चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (२७ जून) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

भोसरी : धान्य देण्याच्या बहाण्याने महिलेला घेऊन जात तिच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर धान्य आणतो म्हणून चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (२७ जून) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे घडली.

या प्रकरणी ६५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दिघी रोडने जात असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी फिर्यादीस धान्य देतो असे सांगून एका ठिकाणी नेले. तिथे फिर्यादी यांना त्यांच्या गळ्यातील दागिने काढून एका पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिने काढून ठेवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखीने दागिने काढून घेतले. त्यानंतर धान्य आणून देतो असे सांगून आरोपी पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest