Wakad : सयाजी हॉटेलच्या पार्किंगमध्ये चोरट्याचा कारनामा, कारची काच फोडून मुद्देमाल पळवला

सयाजी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व आयफोन चोरून नेला आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) रात्री उशीरा पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाकडमधील असलेल्या हॉटेलच्या परिसरात ही घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 7 Oct 2023
  • 06:43 pm
Wakad : सयाजी हॉटेलच्या पार्किंगमध्ये चोरट्याचा कारनामा, कारची काच फोडून मुद्देमाल पळवला

संग्रहित छायाचित्र

सयाजी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व आयफोन चोरून नेला आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) रात्री उशीरा पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाकडमधील असलेल्या हॉटेलच्या परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी राजीवरंजन उमेशकुमार सिन्हा (वय ३५ रा. तळेगाव दाभाडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्हा हे त्यांची कार हॉटेल पार्कींगमध्ये पार्क करून गेले होते. दरम्यान चोरट्यांनी गाडीची काच फोडून त्यातील ७० हजार रुपयांचा लॅपटॉप व २५ हजार रुपयांचा आयफोन असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest