Pune : प्यायला पाणी मागितले तर... पोलीस म्हणाले ‘मूत पी’; हडपसर पोलिसांच्या मगरपट्टा चौकीत महिलेला चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण

पोलिसांच्या मानसिकतेबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. घर मालकाच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर पोलीस

प्यायला पाणी मागितले तर... पोलीस म्हणाले ‘मूत पी’; हडपसर पोलिसांच्या मगरपट्टा चौकीत महिलेला चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण

पुणे : पोलिसांच्या मानसिकतेबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. घर मालकाच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर पोलीस (Hadpsar Police)  ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये घडली. (Pune crime) 

या महिलेले तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता तिला पोलिसांनी ‘मूत पी’ असे म्हणत उपनिरीक्षकासह चार पोलिसांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यामध्ये दोन महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. (Pune Police) 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)



याप्रकरणी पिडीत महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, हडपसर पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून याविषयी बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest