Pune Crime : “तुला मी जिवंत सोडणार नाही”, तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा

“तुझ्या मुळे माझी नोकरी गेली, तुला मी जिवंत सोडणार नाही”, असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडण सोवडवायला आलेल्या मामे भावालाही मारहाण करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 3 Oct 2023
  • 12:46 pm
तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा

तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा

हडपसर पोलीसांनी आरोपी तरुणाला केली अटक

तुझ्या मुळे माझी नोकरी गेली, तुला मी जिवंत सोडणार नाही, असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडण सोवडवायला आलेल्या मामे भावालाही मारहाण करण्यात आली. ही घटना पुण्यातील फुरसुंगी येथील पापडे वस्ती भेकराईनगर येथील सिंहगड कॉलनी लेन परिसरात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी एकाला अटक केली आहे.

पंकज अंकुश धोत्रे (वय २८, रा. सिंहगड कॉलनी, पापडेवस्ती, भेकराई नगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विनय शरद खवळे (वय २४, धंदा नोकरी, रा. सिंहगड कॉलनी, पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगीहडपसर, पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय आणि आरोपी पंकज हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विनय फुरसुंगी येथील रस्त्यावरून जात असताना आरोपी पंकजने त्यला अडवले. त्यानंतर शिवीगाळ करून तोंडावर ठोसा मारला. यात विनय खाली पडला असता त्यांची भांडणे सोडवण्यासाठी विनयचा मामे भाऊ रणजीत रिठे हा मध्ये आला. मात्र, पंकजने त्यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच घरातून लोखंडी धारदार शस्त्र घेऊन येऊन रणजीत यास "तू माझ्याबद्दल चाड्या करतो, तुझ्या मुळे माझी नोकरी गेलीमाझ्याकडे सारखा रागाने बघतो, थांब तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझा कायमचा विषय संपवून टाकतो" असे बोलून रणजीत याचे तोंडावर मारहाण केली. डोक्यावरही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर विनयला देखील हाताच्या ठोशाने मारहाण केली. या प्रकरणी विनयच्या तक्रारीनंतर हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा ४ (२५) सह मपोका ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest