नवरा-बायकोचा दारु पिऊन धिंगाणा, मध्यस्ती करणाऱ्या पोलीसाच्या हाताला घेतला चावा

पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील जय गणेश लॉन जवळ नवरा बायको दारु पिऊन आपआपसात भांडण करत होते. यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, समजावून सांगत असताना महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याची घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 02:49 pm
Rawet Police Station : नवरा-बायकोचा दारु पिऊन धिंगाणा, मध्यस्ती करणाऱ्या पोलीसाच्या हाताला घेतला चावा

मध्यस्ती करणाऱ्या पोलीसाच्या हाताला घेतला चावा

रावेत पोलीस ठाण्यात घडली घटना

पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील जय गणेश लॉन जवळ नवरा बायको दारु पिऊन आपआपसात भांडण करत होते. यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, समजावून सांगत असताना महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी पौर्णिमा गणेश चव्हाण (वय ३०) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास २६ वर्षीय महिला जय गणेश लॉन जवळ आपल्या नवऱ्यासोबत दारू पिऊन भांडण करत होती. यावेळी दोघे शिवीगाळ देखील करत होते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता.

त्यामुळे अमोल सोनावणे नावाच्या व्यक्तीने ११२ वर फोन करून लवकर पोलीस मदत हवी आहे, असे सांगितले. मदतीचा कॉल येताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नवरा-बायकोला रावेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी पौर्णिमा या संबंधित महिलेला समजावून सांगत होत्या. मात्र, दारुच्या नशेत असलेल्या महिलेने आरडाओरडा करुन आर्वाच्च भाषेत बोलायला सुरूवात केली.

त्यानंतर पोलीस कर्मचारी पौर्णिमा यांची कॉलर धरुन उजव्या हाताचे मनगटाच्या बाजुला संबंधित महिलेने दाताने चावा घेतला. यामुळे पौर्णिमा चव्हाण यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय महिलेवर कलम ३५३ आणि ३३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रावेत पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest