हडपसर : २२ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

पुण्यातील फुरसुंगी येथे पाच जणांनी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. ही घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे दीडच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 05:36 pm
Murder : २२ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

संग्रहित छायाचित्र

पोलीसांनी ३०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले

पुण्यातील फुरसुंगी येथे पाच जणांनी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. ही घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे दीडच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी तब्बल ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत.

प्रतिक कामठे (वय २२), शुभम गायकवाड (वय १९), सोन्या पोटे (वय २२), अनिकेत कटके (वय २०) आणि स्वराज दोरगे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर वैभव विठ्ठल गायकवाड (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवलिंग ज्ञानदेव पांढरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे दीडच्या सुमारास वैभव गायकवाड याची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपींचे शेवटचे ठिकाण रावणगाव खडकी येथील स्वामी चिंचोलीजवळ असल्याचे पोलीसांनी दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांचे पथक आरोपीच्या शोध घेत होते. मात्र, आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता.

त्यामुळे पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर गेल्या तीन दिवसांपासून ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपीने माळवंडे परिसरात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्यानंतर पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपींना दौंड येथील बोरबेल येथून ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, उरूसामध्ये झालेल्या भांडणातून तरुणाचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. या पाचही आरोपींवर कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४९, भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७ (१) व १३५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest