Crime News : "तुमच्यावर देव प्रसन्न होणार आहे"; तुमचे भविष्य सांगतो असे म्हणत वृद्धेचे मंगळसूत्र लुबाडले

पायी जाणाऱ्या महिलेला जवळ बोलावून देवाचे व भिवष्याबद्दल सांगतो म्हणून महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लुबाडले आहे. ही घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडे दहा वाजता दिघी येथे घडली आहे. महिलेने दिघी पोलीस (Dighi Police) ठाण्यात फिर्याद दिली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 3 Nov 2023
  • 08:25 pm
Crime News

संग्रहित छायाचित्र

पायी जाणाऱ्या महिलेला जवळ बोलावून देवाचे व भिवष्याबद्दल सांगतो म्हणून महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लुबाडले आहे. ही घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडे दहा वाजता दिघी येथे घडली आहे. महिलेने दिघी पोलीस (Dighi Police)  ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Pimpri Chinchwad Crime).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दिघी येथील विठ्ठल-रुक्मीणी मंदिराजवळून पायी घरी जात होत्या. यावेळी ओरपींनी त्यांना खूनवून जवळ बोलावून घेतले. त्यांना देवाचे व भविष्याचे सांगता येते असे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून "तुमच्यावर देव प्रसन्न होणार आहे" सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ७० हजार रुपयांचे मंगळसुत्र घेतले. त्यावर मंत्र फुकण्याचा बहाणा करून मंगळसुत्र पिशवीत ठेवले आहे सांगत महीलेला लुबाडले. आपली फसवणूक झाली आहे समजताच संबंधित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest