Pune Crime News : कामावर घ्या... नाहीतर पेट्रोल पंप जाळून टाकीन

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने मालकाला पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. तसेच पंपावरील एसटीपी वायर आणि फ्युज जाळून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 23 Oct 2023
  • 04:17 pm
Pune Crime News : कामावर घ्या... नाहीतर पेट्रोल पंप जाळून टाकीन

संग्रहित छायाचित्र

पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने मालकाला पेट्रोल पंप (petrol pump) जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली. तसेच पंपावरील एसटीपी वायर आणि फ्युज जाळून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हांडेवाडी येथील कीयांच पेट्रोलियम या ठिकाणी घडली. या प्रकरणी हडपसर (Hadpasar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकबर हुसेन तांबोळी (वय ४२, रा. मंतरवाडी चौक, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यशपाल राजेंद्र नागोरी (वय २७, रा. कल्याणी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. नागोरी यांनी तांबोळी याला कामावरून काढलेले होते. आरोपी हा पेट्रोल पंपावर गेला. त्याने 'मला कामावरून का काढले? मला कामावर घ्या. नाहीतर मी पेट्रोल पंप जाळून टाकीन,'अशी धमकी दिली.

पेट्रोल पंपावरील इलेक्ट्रिक रूममध्ये त्याने प्रवेश केला. तेथील पेट्रोल आणि डिझेलच्या एसटीपी वायर तोडल्या. त्यातील फ्युज जाळून कामगारांच्या आणि पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest