Crime News : खालुंब्रे येथे तरुणाकडून तब्बल ९ लाख रुपयांचा गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत खेड तालुक्यातील खालुंब्रे (Khalumbre) या गावात एका तरुणा कडून तब्ब्ल ९ लाख २ हजार रुपयांचा गांजा (Ganja) जप्त केला आहे.हि कारवाई (Crime News) पोलिसांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाळुंगे एमआयडीसी (Mahalunge MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 27 Oct 2023
  • 07:50 pm
Crime News : खालुंब्रे येथे तरुणाकडून तब्बल ९ लाख रुपयांचा गांजा जप्त

संग्रहित छायाचित्र

पिंपरी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत खेड तालुक्यातील खालुंब्रे (Khalumbre) या गावात एका तरुणा कडून तब्ब्ल ९ लाख २ हजार रुपयांचा गांजा (Ganja) जप्त केला आहे.हि कारवाई (Crime News) पोलिसांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाळुंगे एमआयडीसी (Mahalunge MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.

मोहीत महेंद्र आगळे (Mohit Mahendra Agle) (वय २५ रा.तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे साथीदार काजल जावेद खान व नंदा विलास बोत्रे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रणधीर माने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून मोहित याला खालुंब्रे येथे कैलास व विलास धोत्रे यांच्या चाळी जवळून ताब्यात घेतले. यावेली त्याच्या कडे ८ किलो ७१३ ग्रॅम वजानाचा गांजा व तीन मोबाईल फोन असे एकूण ९ लाख २ हजार 300 रुपयांचा एवज जप्त केला. मोहित हा तेथे गांजा विक्रीसाठी आला होता. मोहित याने हा गांजा ओडीसा येथून एकाकडून विकत घेतला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींवर एन.डी.पी.एस.अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest