Fraud : कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्ड इन्शुरन्स असून तो कॅन्सल करण्याच्या बहाण्याने एका महिलेची एक लाख ८० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ७ ऑगस्ट २०२३ रोजी हिंजवडी येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 7 Nov 2023
  • 07:55 pm
Fraud : कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

कार्ड इन्शुरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्ड इन्शुरन्स असून तो कॅन्सल करण्याच्या बहाण्याने एका महिलेची एक लाख ८० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ७ ऑगस्ट २०२३ रोजी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी संबंधित महिलेने एका मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात सोमवारी (६ नोव्हेंबर) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो कोटक महिंद्रा बँक, मुंबई येथून बोलत असल्याचे फिर्यादीस सांगितले. 'तुमच्याकडे जे क्रेडीट कार्ड आहे, त्यावर कार्ड इन्शुरन्स आहे. त्यासाठी तुमच्या कार्डवरून प्रत्येक महिन्याला २ हजार ९५० रुपये चार्ज लागेल. ते कॅन्सल करायचे असेल तर मी कॅन्सल करून देतो, असेही आरोपीने सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना विश्वासात घेऊन गोपनीय माहिती घेत कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडीट कार्डवरून १ लाख ८० हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest