पिंपरी-चिंचवड : एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून एका व्यक्तीच्या खात्यावरून ७० हजार ७०० रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना बुधवारी (२६ जून) सायंकाळी दिघी येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

दादाभाऊ श्रावण मुंढे (वय ५३, रा. दिघी) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी खरेदीसाठी गेले होते. पैसे काढण्यासाठी ते एटीएम सेंटरमध्ये गेले. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांचा पिन नंबर चोरून पाहिला. त्यानंतर एटीएम कार्डद्वारे फिर्यादींच्या खात्यातून ७० हजार ७०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest