Lalit Patil Case : ...अखेर विनय अर्हाना ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला ससून रुग्णालयामधून (Sasoon Hospital) मधून पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या (drug) आरोपाखाली पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अर्हाना याला पुणे पोलिसांच्या गुन्हे (Crime News) शाखेने अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 25 Oct 2023
  • 07:21 pm
Lalit Patil Case : ...अखेर विनय अर्हाना ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात

...अखेर विनय अर्हाना ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात

लक्ष्मण मोरे

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला ससून रुग्णालयामधून (Sasoon Hospital) मधून पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या (drug) आरोपाखाली पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अर्हाना याला पुणे पोलिसांच्या गुन्हे (Crime News) शाखेने अटक केली आहे. त्याला या संदर्भात ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच त्याच्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक (Arrested) केलेली होती. अत्यंत हाय प्रोफाईल बनलेल्या या प्रकरणामध्ये विनय अर्हाना याने ललित पाटीला याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे. (Pune News)

विनय विवेक अर्हाना (वय ५२, रा. १४, डॉ आंबेडकर मार्ग, कॅम्प) असे त्याचे नाव आहे. ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ललित पाटील सुरुवातीला लेमन ट्री हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर तो बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या इथे आला. त्यावेळी  अर्हानाचा ड्रायव्हर दत्ता डोके हा तिथे त्याची वाट बघत उभा होता. त्याच्या ह्युंडाई व्हेन्यू गाडीमधून त्याने त्याला रावेत येथे पोहोचवले आणि रोझरीच्या मॅनेजरकडून दहा हजार रुपये घेऊन ते ललित पाटीलला दिले. याच पैशांच्या जोरावर ललित पाटील पोलिसांच्या कक्षेबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर दत्ता डोके याला पोलिसांनी निष्पन्न केले होते आणि त्याला अटक केली होती.

सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. दरम्यान, गुन्हे शाखेला रोझरी शाळेच्या इमारतीच्या आवारामध्ये ललित पाटील फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले होते. त्याच्या आधारे रोझरी शाळेच्या एका व्यवस्थापकाकडे देखील चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने अर्हाना यानेच दत्ता डोके याच्याकडे दहा हजार रुपये देण्यास सांगितल्याचे जबाबमध्ये सांगितले होते. ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली असून तो सध्या मुंबई पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. तर, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणामध्ये त्याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक केली होती. त्यानंतर, ललित पाटील याच्या प्रज्ञा अरुण कांबळे आणि अर्चना किरण निकम या दोन मैत्रिणींना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये १२ जणांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत.

दरम्यान ललित पाटील प्रकरणांमध्ये अर्हाना याला आरोपी करून त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच पोलिसांनी केलेलेच होते. याच काळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणातील कोणालाही सोडणार नसल्याची ग्वाही प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली होती. पुण्यामधील शैक्षणिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ असलेल्या विनय अर्हाना याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विनय अर्हाना सध्या ईडीच्या कोठडीमध्ये असून तो ससून रुग्णालयातील १६ नंबर वॉर्डमध्ये उपचार घेत होता. याच वॉर्डमध्ये त्याची आणि ललित पाटील याची ओळख झाली. याच ओळखी मधून त्यांच्यामध्ये काही कॉन्टॅक्टची देखील देवाण-घेवाण झाल्याचे पोलिसांनी सूत्रांनी सांगितले. ललित पाटील आणि वॉर्डमध्ये यांच्यामध्ये नेमके कोणते कनेक्शन आहे? याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest